🙏 एक मनापासूनचा विचार… 🙏

संज्ञा संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती आणि विशेष मुलांसाठी १९९३ पासून सुरू असलेले हे सेवाकार्य पुढील अनेक दशके अखंडपणे सुरू राहावे, यासाठी आपण सुमारे ५ कोटी रुपयांचा भक्कम Corpus Fund (कायमस्वरूपी निधी) उभारण्याचा संकल्प करूया.

या निधीतून मिळणारे व्याज, दरमहा मिळणारे योगदान आणि आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तींची साथ यामुळे आज सुरू असलेले हे सेवाकार्य उद्याही तितक्याच ताकदीने सुरू ठेवता येईल.

ही केवळ देणगी नाही…
❤️ ही विशेष मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे.
❤️ ही त्यांच्या स्वप्नांना दिलेली साथ आहे.
❤️ ही त्यांच्या आयुष्याला आधार देणारी माणुसकीची एक छोटीशी पाऊलवाट आहे.

म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार या पवित्र कार्यासाठी सढळ हाताने योगदान द्यावे, ही मनापासून विनंती. 🙏

आपले योगदान देताना कृपया “CONTRIBUTION FOR CORPUS” असा उल्लेख करावा. 💐

आजची आपली छोटीशी मदत, उद्याच्या अनेक विशेष मुलांच्या आयुष्यात मोठा आधार ठरू शकते. ❤️

चला…
एकत्र येऊया, हातात हात देऊया आणि या सेवाकार्याला कायमस्वरूपी बळ देऊया. 🙏💐

संज्ञा संवर्धन संस्था
डॉ. राजेश्वर उत्तरवार, श्री. रवींद्र सावजी 🙏